पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा; बनावट नोटांची उधळण…

पुणे: पुणे शहरातील एका प्रसिद्ध पबमध्ये जोरदार राडा झाला असून, पबची तोडफोड देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या पबमध्ये गायकावर दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा उधळण्यात आल्या आहेत. गोंधळ झाल्यामुळे कार्यक्रम मध्येच बंद करण्यात आला, कार्यक्रम मध्येच बंद केल्यामुळे वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे शहरातील प्रसिद्ध पब वॉटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पबमध्ये कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान गायकावर दोन हजारांच्या बनावट नोटांची उधळण करण्यात आली. या नोटांवर प्रसिद्ध कव्वाल बिस्मील यांचा फोटो होता. यामुळे पबमध्ये गोंधळ निर्माण झाला.

कव्वालीच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाल्याने आयोजकांनी हा कार्यक्रम मध्येच बंद केला. कार्यक्रम मध्येच बंद केल्यानंतर वाद वाढला. कार्यक्रम मध्येच बंद केल्यामुळे सात ते आठ जणांनी वॉटर हॉटेलमध्ये प्रवेश करून तोडफोड केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या आयोजकांनी या बनावट नोटांचे फोटो इस्टाग्रामवर टाकले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!