महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…
नागपूरः भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या जबलपूर (मध्य प्रदेश) येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असून, 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल झाले आहे, मात्र, संबंधित व्यक्ती तिथून फरार असल्याची माहिती समोर आली आहे. सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. बिझनेस पार्टनरने त्यांचा खून केल्याचा तर्क लढवला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जबलपूरमध्ये सना खान यांचा साहू नावाचा बिझनेस पार्टनर आहे, जो या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. सना खान 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या आणि दुसऱ्या दिवसापासून त्या बेपत्ता आहेत. साहूचा जबलपूरमध्ये ढाबा आहे. 1 ऑगस्टपासून सना यांच्याशी संपर्क न झाल्याने संशय वाढाला आणि त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी मानकापूर पोलिसांत दाखल केली.
‘आम्ही कुटुंबियांच्या तक्रारीवरुन सना खान बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. पोलिसांचे पथक जबलपूरला रवाना झाले आहे. परंतु, सध्या तरी सना खान यांचा शोध लागलेला नाही. तसंच त्यांचा मृत्यू अथवा खून झाल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे त्या जिवंत आहेत किंवा नाहीत याबाबत भाष्य करु शकत नाही. आमचा तपास सुरु आहे,” अशी माहिती मानकापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली.
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…