भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…

नागपूर : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला असून, तो मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सना खान यांच्या पतीने त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पण, पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह सना खान यांचा असण्याची शक्यता आहे. कारण, मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत असल्यामुळे तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित मृतदेह सना खान यांचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती नागपूर पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

नागपूर पोलिसांचे एक पथक सध्या घटनास्थळी रवाना झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या विहिरीत महिलेचे मृतदेह मिळाला आहे, ती विहीर जबलपूरपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. सना खान यांचा पती अमित साहू यानं हत्येची कबूली दिली, त्यावेळ हत्या कडून मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले होते. मात्र, आता नदीत सापडलेला मृतहेद सना खान यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यास अमित साहू पोलीस तपासात खोटं बोलून दिशाभूल करत असल्याचं स्पष्ट होईल. तपासानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल.

काय आहे प्रकरण?
सना खान 1 ऑगस्टला अमित शाहू याला भेटायला जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी अमित साहूसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण झालं. त्यानंतर सना त्याच रात्री तातडीने अखेरच्या बसने जबलपूरला गेल्या, मात्र तेथून परतल्या नाही. अमित साहू हा जबलपूरमधील एक हॉटेल व्यावसायिक आहे. नंतर सना खान आणि अमित साहू पती-पत्नी असल्याचे समोर आले आहे.

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!