
दुचाकीवरून येऊन मंगळसुत्र चोरणाऱ्यांना भोसरी पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत महिलेचे मंगळसुत्र चोरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत ११/०१/२०२४ रोजी रात्रौ ०९/१५ वा.चे सुमारास आदी इस्टेट सोसायटी समोर बो-हाडेवाडी मोशी पुणे येथे एक महिला रोडने पायी चालत जात असताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोन जणांनी तीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करुन नेले होते सदर बाबत एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २४/२०२४ भा.द.वि.स. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास करुन गुन्हा उघड करण्याबाबत बापु ढेरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेंद्र पानसरे पोलिस उप निरीक्षक एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन यांना आदेश दिले होते. सदर गुन्हयाचा तपास करत असताना पोलिस उप निरीक्षक पानसरे यांनी तपास पथकातील अंमलदार यांचे मार्फतीने गुन्हा घडले ठीकाणचे आजुबाजुचे परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक विश्लेषन करुन गुनहयातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती घेतली असता सदर गुन्हयातील आरोपी ०३/०३/२०२४ रोजी विना नंबर प्लेटचे पल्सर मोटर सायकल वरुन खडीमशिन रोड मार्गे, मोशी येथे सोने विक्रीकरीता येणार असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी तपास पथकातील अंमलदार मार्फत सापळा रचून पाठलाग करुन पकडले.
१) अक्षय राजु शेरावत (वय-२३ वर्षे रा.मु. हिंगणगाव पो. आष्टापुर, ता. हवेली जि. पुणे). २) अजय राजु शेरावत (वय २२ वर्षे. रा. सदर) अशी दोघांची नावे आहेत. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अक्षय शेरावत याच्या जवळ सोन्याचे मंगळसुत्र मिळुन आल्याने सदर सोन्याच्या मंगळसुत्रा बाबत चौकशी केली असता त्यांनी ते एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन गु.र.नं. २४/२०२४ मधील जबरीने चोरुन नेलेले असल्याचे निष्पन्न झाले सदर मंगळसुत्र व आरोपीकडे आसलेली १,२०,०००/- रुपये किमतीची पल्सर मोटर सायकल जप्त करुन त्यांना ताब्यात घेवुन ०३/०३/२०२४ रोजी सदर गुन्हयात अटक करुन त्यांचकडे तपास केला असता. त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयचे हद्दीत इतर ठिकाणी गुन्हे केले असल्याचे कबुल करुन त्यांनी इतर ठिकाणी चोरी केलेले सोने हे आरोपी अनिल अंकुश नानावत (वय- ३९ वर्षे. रा. सणसवाडी ता. शिरुर. जि. पुणे). यास विकले असल्याचे सांगितले.
सोने विकत घेणा-या सदर आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ०५/०३/२०२४ रोजी एम. आय. डी. सी भोसरी गु.र.नं. ४४ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९४,४११,३४ प्रमाणे गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता त्यानी सदर गुन्हयातील सोने काढुन दिल्याने ते जप्त करण्यात आले असुन तपासात खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडुन एकुण ८ तोळे ३०० मिली ग्रॅम सोन्याचे दागिने, एक पल्सर मोटर सायकल असा एकुन ४,१५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी हे सध्या पोलिस कस्टडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार परि-०३, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर चाकण विभाग. MIDC भोसरी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापु ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उप-निरीक्षक राजेंद्र पानसरे पोलिस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहुल लोखंडे, नितिन खेसे, भागवत शेप, विशाल काळे, अनिल जोशी, प्रवीण मुळूक, अक्षय क्षीरसागर आंनद जाधव अनिकेत कांबळे मपोशि खंदारे व राजु जाधव यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास राजेंद्र पानसरे पोलिस उप निरीक्षक एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशनचे हे करीत आहेत.
भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी हस्तगत…
पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

