खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबल आणि पतीची बदली…

मुंबई : चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने लगावली होती. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बदली करण्यात आली आहे.

कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पुढे या महिला CISF कॉन्स्टेबलवर काय कारवाई होणार? की नोकरी जाणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, तिच्या पतीचीही बदली झाली आहे. चंदिगड विमानतळावर कंगना रणावतला थप्पड मारल्याच्या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले होते. आता तिची बंगळुरू येथे बदली करण्यात आली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

कंगनाला कानशिलात लगावल्यानंतर तिने या कानशिलात लगावल्या मागचे कारण सांगितले होते. व्हिडीओमध्ये ती महिला म्हणताना दिसत आहे, ‘कंगना यांनी शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन बसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी माझी आई शेतकरी आंदोलनात जायची.’

दरम्यान, कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. ही अभिनेत्री आता खासदार झाली आहे. यामुळे कंगना दुपारी दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावरून निघाली होती. मात्र सुरक्षा तपासणीनंतरच हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात कंगना थप्पड मारल्यानंतर खूप संतापली होती. ती लेडी कॉन्स्टेबलशी वाद घालतानाही दिसली. कंगनाने दिल्ली गाठून सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती.

अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…

प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…

अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!