
प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…
विशाखापटणम (आंध्र प्रदेश) : एका महिलेच्या प्रियकराने महिला आणि तिच्या 13 वर्षांच्या मुलीच्या नदीत ढकलून दिले. मात्र ही मुलगी रात्रीच्या काळोखात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ एका पाइपाला लटकून राहिली आणि त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. राजमहेंद्रवरमजवळील रवूलापलेम येथे ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
गुंटूर जिल्ह्यातील असलेल्या ताडेपल येथील पुप्पला सुहासिनी (वय 36) या वादामुळे पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यांना कीर्तना (वय 13) नावाची मुलगी असून, ती त्यांच्यासोबत राहते. प्रकाशम जिल्ह्यातल्या दारसी येथील उल्वा सुरेश यांच्या संपर्कात ही महिला आली. गेल्या दोन वर्षांपासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते. या जोडप्याला एक नावाची मुलगी (वय एक वर्षे) झाली. सुरेश आणि सुहासिनी यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर त्याने सुहासिनी आणि तिच्या दोन मुलींना संपवण्याचा निर्णय घेतला. कपडे खरेदीच्या बहाण्याने त्याने शनिवारी सायंकाळी तिघींना कारमध्ये बसवून राजमहेंद्रवरम येथे आणले. तिघींना कारने रात्रभर शहरात फिरवले आणि रविवारी (ता. 6) पहाटे चार वाजता रावुलापलेमच्या गौतमी जुन्या पुलावर गाडी आणली.
सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याने सुहासिनी आणि तिच्या दोन मुलींना पॅरापेट भिंतीजवळच्या रेलिंगजवळ उभे केलं आणि अचानक त्यांना नदीत ढकलले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. सुहासिनी आणि चिमुकली नदीत पडल्या. कीर्तनाने पुलाला लागूनच टाकलेला केबल पाइप घट्ट पकडला. ती एका हाताने पाइपला आणि जोर- जोरात ओरडू लागली.
एका हाताने पाइपला लटकत असतानाही तिने खिशातला मोबाइल शोधला आणि दुसऱ्या हाताने तो बाहेर काढला. तिने 100 नंबरला कॉल करून आपली परिस्थिती पोलिसांना कळवली. रवूलापलेम उपनिरीक्षक व्यंकटरमण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला वाचवले. त्यांनी कीर्तनाच्या धाडसी कृत्याचं आणि तिच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. पोलिस सुहासिनी आणि चिमुकलीचा शोध घेत आहेत. पोलिस अधिकारी रजनी कुमार यांनी सांगितले, पोलिस पथकं स्थापन केली असून, आरोपीचा शोध सुरू आहे.’
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
रोमिओची धुलाई; अब तू मर और बोल आय लव यू…
प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…
माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…