साध्या वेशातील पोलिसांनी फ्रुटी वाटली अन् मास्क काढताच अडकले…

चंदीगड (पंजाब) : पंजाबमध्ये साडेआठ कोटींचा डल्ला मारणाऱ्या दरोडेखोर मनदीप कौर मोना आणि तिचा पती जसविंदर या दोघांच्या मसुक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी साडेआठ कोटींच्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

लुधियानाच्या न्यू राजगुरू नगरमध्ये 10 जून रोजी दरोडा पडला होता. त्याची मुख्य सूत्रधार मनदीप कौर मोना होती. घटना घडल्यापासून ती फरार झाली होती. पंजाब पोलिसांना मनदीप आणि जसविंदर दोघेही हेमकुंड साहिबमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. साध्या वेशातील पोलिसांनी तेथील भाविकांना मोफत फ्रुटी वाटण्यास सुरुवात केली. मोना, जसविंदरने फ्रुटी पिण्यासाठी मास्क काढताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत दोघांच्या हातात बेड्या घातल्या.

चंदीगडचे पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितले की, ‘मनदीप आणि तिच्या पतीला लवकर श्रीमंत व्हायचे होते. मनदीपला परदेशात स्थायिक व्हायचे होते. दोघे नेपाळमार्गे पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु, लुकआउट नोटीस जारी झाल्यामुळे त्यांचा हा कट फसला. त्यानंतर हेमकुंड साहिबहून दोघांना केदारनाथ आणि नंतर हरिद्वारला जायचे होते. परंतु, त्या अगोदरच दोघांना पकडण्यात यश आले आहे.’

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!