एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

सोलापूर : एकाने एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या केल्यामुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे. ऋतुजा दादासाहेब मदने असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेतील संशयित आरोपी फरार असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

सांगोला येथील महाविद्यालयीन युवती ऋतुजा हिचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित युवती कोळा येथील रहिवासी आहे. या हत्या प्रकरणाची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे करत आहेत.

युवतीची हत्या करणारा आरोपी युवक सध्या फरार आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!