भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…
हरारे (झिम्बाब्वे) : भारतीय अब्जाधीश उद्योगपती हरपाल रंधवा आणि त्यांचा मुलाचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. दक्षिण-पश्चिम झिम्बाब्वेमधील हिऱ्याच्या खाणीत विमान कोसळून या भारतीय व्यावसायिकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. विमान हरारेहून मुरोवाला जात असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले आणि अपघात झाला.
विमानात चार परदेशी नागरिक होते आणि इतर दोघे झिम्बाब्वेचे होते. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते 8 च्या दरम्यान हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे विमान सकाळी सहा वाजता हारारेहून खाणीकडे निघाले होते आणि मशावापासून सुमारे 6 किमी अंतरावर असताना ते कोसळले. विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. विमान अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.
भारतीय उद्योगपती आणि अब्जाधीश हरपाल रंधावा यांना मायनिंग किंग म्हणून ओळखले जात होते. त्यांची कंपनी रियोजिम सोना, कोळसा, निकेल आणि तांबे शुद्धीकरणाचं काम करते. याशिवाय रंधावा हे जेम होल्डिंग या चार अब्ज डॉलर्सच्या इक्विटी फर्मचे संस्थापक होते. रिओजिमची सुरुवात 1956 मध्ये रिओ टिंटो साउदर्न रोडेशिया लिमिटेड म्हणून झाली.
रंधावा यांच्या कुटुंबीयांनी 4 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्या आणि त्यांचा मुलगा आमेर याच्यासाठी मेमोरियल सर्व्हिसचे आयोजन केले आहे. त्यांचे सर्व मित्र आणि इतर मान्यवरांना यासाठी बोलावले आहे. हा कार्यक्रम हारारे येथील रेनट्रीमध्ये होणार आहे.
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…
महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…