पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…

पुणे : पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीच्या दिशेने जात होती. नतावाडी आगारातील बस तळेगाव ढमढेरे ते मनपा ही पुण्याकडे येत होती. बीआरटी थांबाच्या परिसरात दोन्ही बस एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. आज (मंगळवार) सकाळी ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात बसचा वेग अधिक असल्याने इलेक्ट्रिक बसचा पुढील भाग समोरील बस मध्ये घुसल्यामुळे अनेक प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

बस अपघातात इलेक्ट्रिक बसचा वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी स्थानिक नागरिकांकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. जखमी प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. जखमींच्या हात, तोंड, पायाला मार लागला आहे. जखमींमध्ये आठ महिलांचा समावेश असून सतरा प्रवासी व दोन्ही चालक व दोन्ही वाहक आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही.

पीएमपीएल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून दोन्ही बस हटवण्यात आल्या असून वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; पाहा वाहतूकीतील बदल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!