अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक…

मुंबई : मुंबईतील ओशिवारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओशिवारातील नालंदा इमारतीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे हा गोळीबार एका मॉडेल आणि एका लेखकाच्या घराच्या दिशेने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील ओशिवारातील नालंदा इमारतीमध्ये 18 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोळीबार थेट एका मॉडेल आणि लेखकाच्या घराच्या दिशेने झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. गोळीबार घराच्या आतून करण्यात आल्यामुळे घटनास्थळी फारसे पुरावे हाती लागत नव्हते. ओशिवरा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी तांत्रिक तपास त्यासोबत वेगवेगळ्या अँगलने तपास करून अभिनेता कमाल खान याला अटक केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💗 (@ishwari16official)

मुंबई पोलिसांच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्याने चौकशीदरम्यान गोळीबार त्याच्या परवानाधारक बंदुकीतूनच केल्याची कबुली दिली. या प्रकरणात वापरण्यात आलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. चौकशीदरम्यान अभिनेत्याने पोलिसांना सांगितले की, कोणालाही इजा पोहोचवण्याचा त्याचा हेतू नव्हता. तो केवळ आपली बंदूक स्वच्छ करत होता आणि स्वच्छता झाल्यानंतर बंदूक नीट काम करते की नाही, याची खात्री करण्यासाठी त्याने गोळी झाडली. त्याच्या घरासमोर मोठा मॅन्ग्रोव्ह परिसर असल्याने तो भाग अशा चाचणीसाठी योग्य असल्याचे त्याला वाटले, असेही अभिनेत्याने स्पष्ट केले.

अभिनेता कमाल आर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची रात्रभर चौकशी करण्यात आली. चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ओशिवरा पोलिसांनी कमाल आर खान याला अधिकृतपणे अटक केली. ओशिवारा गोळीबार प्रकरणामुळे चित्रपट सृष्टीत चर्चांना उधाण आले आहे.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…

Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…

उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांनी पकडले रंगेहात…

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!