घरात हीटर लावताच विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू…

औरंगाबाद : घरात लावलेल्या हीटरमुळे एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिल्लोडच्या रेलगाव येथे घडली आली आहे. स्वाती विष्णू काजले (वय 23) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले या शुक्रवारी सायंकाळी घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावत होत्या. यावेळी स्वाती यांना हीटरचा शॉक लागला. यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. ही घटना त्यांचे पती विष्णू काजले यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी स्वाती यांना तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले होते. शनिवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी रेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

ठाणे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

धक्कादायक! मोठ्या भावाने घेतले उसने पैसे अन् खून झाला छोट्या भावाचा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!