रेल्वे स्थानकावर पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला…
मुंबई: विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. शिव शर्मा आणि वीरशिला शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे. विरार स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरशिला शर्मा ही कामावर जात असताना शिव शर्माने तिच्यावर हल्ला चढवला. विरार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकला लागून असलेल्या पादचारी पुलावर हा प्रकार घडला. वीरशिला शर्मा आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजता कामाला निघाली होती. त्यावेळी तिचा नवरा शिव शर्मा याने तिला विरारच्या रेल्वे ब्रीजवर एकटे गाठून तिच्यावर हल्ला केला. शिव शर्मा याने वीरशिला हिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु, वीरशिला हिने चाकूचे पाते हाताने धरुन ठेवले. यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला. मात्र, चाकू हल्ला रोखताना तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या गळ्यावरही चाकूचा एक वार झाला आहे.
वीरशिला शर्मा हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तिचा पती शिव शर्माला ताब्यात घेतले आहे. शिव आणि वीरशिला यांच्यात वाद होता. कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी काल हे दोघेही विरार पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी त्यांना समजावून सोडले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! युवक झोपेत असताना लागला चालू अन्…
नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…
धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…
पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…