
दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…
पाटणा (बिहार): पाटणा शहरातील फुलवारी शरीफ येथे उत्तर प्रदेशातील बदायूं येथील युवकाच्या मृत्यूचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. सासू, सासरा आणि पत्नीने मिळून युवकाचा गळा आवळून खून केला होता. मृताची पत्नी असमेरी खातून उर्फ मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केली होती. मृत सुभाष हा तिचा तिसरा पती होती. चौथ्यांदा तिला लग्न करायचे असल्यामुळे खून केला आहे, असे युवकाच्या भावाने म्हटले आहे.
कुटुंबीयांनी सांगितलं की, सुभाष प्रजापती याचा दोन वर्षांपूर्वी फुलवारी शरीफ येथील असमेरी खातून हिच्याशी विवाह झाला होता. असमेरी खातून हिचे यापूर्वी दोनदा लग्न झाली होती. दोन्ही पतींना सोडल्यानंतर तिने दोन वर्षांपूर्वी सुभाष प्रजापती याच्याशी तिसरे लग्न केले. मृताचा भाऊ ब्रिजेश प्रजापती याने सांगितले की, असमेरी खातूनने सुभाषला आपल्या जाळ्यात ओढत त्याच्यासोबत लग्न केले. असमेरी खातून हिला आधीच्या दोन पतींपासून दोन मुलेही आहेत. असमेरी हिचे दुसऱ्या मुलासोबत अनैतिक संबंध होते. सुभाष या मृत्यूनंतर त्याची पत्नी असमेरी खातून हिला चौथ्यांदा त्या मुलासोबत लग्न करायचे होते. याची माहिती सुभाष प्रजापतीला मिळाली होती. याची माहिती सुभाष यांना मिळताच त्यांनी पत्नी असमेरी खातून हिला विरोध सुरू केला. या विरोधामुळे पत्नी असमेरी खातून, सासू अख्तारी खातून आणि सासरे मोहम्मद अलाउद्दीन यांनी मिळून जावयाचा दोरीने गळा आवळून खून केला.’
फुलवारी शरीफ पोलिस स्टेशनचे प्रभारी सफिर आलम यांनी सांगितलं की, ‘सुभाष प्रजापती यांचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना मृताच्या मानेवर खुणा आढळल्या होत्या. शवविच्छेदन अहवालात सुभाषची हत्या झाल्याचेही समोर आले होते. सुभाष याच्या सासरच्या परिसरात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सासरच्या मंडळींची कडक चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास करत आहोत.’
दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…
मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…