हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

बीड : रिक्षा आणि कंटेनरच्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर बकरवाडी फाट्याजवळ घडली आहे. माहेरवरून रिक्षाने परत येत असलेल्या या महिलेवर आणि तिच्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळी कडे जाणाऱ्या कंटेनरने चिरडले. या भीषण अपघातात रिक्षातील महिलेसह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा भीषण अपघात रविवारी (ता. १०) रात्री 9च्या सुमारास बीड -परळी रोडवरील बकरवाडी फाट्यावर घडला. अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

बीड शहरातील अजीम शेख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह रविवारी सकाळी थेटे गव्हाण (ता. धारूर) इथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरचा ताबा सुटला. यामुळे कंटेनरची समोरून येत असलेल्या रिक्षाला जोराची धडक बसली. या धडकेत नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13 ) आणि अदनान अजीम शेख (वय 12 ) हे तिघे जागीच ठार झाले.

रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ठाणे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला…

हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!