पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!

पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून ३६० दिवसांमध्ये मोक्काचे शतक पूर्ण केले आहे. पोलिस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत १००वी कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर पुणे करांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

बिबवेवाडी पोलिस स्टेशन हद्दीमधील सौरभ शरद शिंदे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ४ साथीदार यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ०८/११/२०२३ रोजी कुसळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतून आत तीन मंदिराचे मोकळया मैदानात, अप्पर – बिबवेवाडी, पुणे येथे यातील फिर्यादी यांचा मुलगा हा रात्री १२.३० वा चे सुमारास जेवण करुन घरी परत येत असताना त्याचे ओळखीचे आरोपी १) सौरभ शिंदे, २) तेजस जगताप, ३) चंदर राठोड, ४) अनिकेत काटकर व ५) पंकज दिवेकर सर्व अप्पर बिबवेवाडी पुणे यांनी आपआपसात संगनमतकरुन फिर्यादी यांचा मुलास पकडले. त्यास कुसळकर किराणा मालदुकानाचे गल्लीतुन आत तीन मंदिराचे मोकळया मैदानात अप्पर बिबवेवाडी येथे घेवुन जावुन पुर्वी झालेल्या वादावरुन सदर आरोपींनी त्यांच्या कडील लोखंडी रॉड व बांधकामासाठी वापरण्यात येणारी लाकडाची फळीने त्याचे दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघा व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. २३९ / २०२३, भा.दं. वि. कलम ३०७,३२३, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.

दाखल गुन्हयांचे तपासा दरम्यान आरोपी
१ ) तेजस शंकर जगताप, वय २० वर्षे, रा. बी/३५/१२, अप्परइंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे. (टोळी सदस्य)
२) अनिकेत सुधीर काटकर, वय २२ वर्षे, रा. बी / ३६ / ०३, अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी, पुणे. (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात
आली असून ते सद्या येरवडा जेल पुणे येथे आहेत. तसेच आरोपी
१) सौरभ शरद शिंदे वय २२ वर्षे, रा.बी ३५/१२ अप्परइंदिरानगर बि. वाडी पुणे ( टोळी प्रमुख )
२) चंदर उन्नप्पा / हुन्नप्पा राठोड, वय २२ वर्षे, रा.चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी पुणे ( टोळी सदस्य ) व
३) पंकज संजय दिवेकर वय १९ वर्षे, रा. स.नं. ६४९, गणपतीमंदिरा जवळ, खडकेवस्ती, अप्पर बिबवेवाडी पुणे ( टोळी सदस्य ) हे सदर गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी
आहेत.

आरोपी सौरभ शिंदे (टोळी प्रमुख) याने टोळीमधील वरील सदस्यांना बरोबर घेवुन दखलपात्र गुन्हा करुन, टोळीची दहशत व वर्चस्व निर्माण करुन, त्यायोगे बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने बेकायदेशीर खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दरोडा या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत. आरोपी यांचे विरुध्द वेळोवेळो प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४)प्रमाणे अंतर्भावकरणे कामी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर, सविता ढमढेरे यांनी पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०५, पुणे शहर, आर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करून बिबवेवाडी पोलिस ठाणे, गुन्हा नोंदक्र. २३९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३२३,१४३,१४७,१४८, १४९, महाराष्ट्र पोलिस अधि. कलम ३७(१) सह १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२).३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. शाहुराजे साळवे हे दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे हे करीत आहेत.

सदर कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे, (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, मा. अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त परि ०५, पुणे शहर, आर राजा, सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर, श्री शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली, बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीमती सविता ढमढेरे, पोलिस उप-निरीक्षक बाळु शिरसट, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलिस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे व कृष्णा फुले यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही १००वी कारवाई आहे.

मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…

मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’

मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…

मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…

मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…

मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!