ठाणे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला…

ठाणे: ठाण्यातील बाळकुम येथे एका ४० मजली नवीन इमारतीची लिफ्ट कोसळून रविवारी (ता. १०) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

इमारतीची लिफ्ट कोसळून प्रथम झालेल्या अपघातात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली. यामध्ये सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते. इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होते. वॉटरप्रुफिंगचं हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला.

जखमींपैकी सुनील कुमार दास (वय 21) या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा कामगार निपुण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला होता. परंतु उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…

धक्कादायक! भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!