मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…

पुणे : पुणे शहरात दोघांवर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९५ टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने दोघांना धारदार हत्याराने मारहाण करुन जखमी केले. तसेच हवेत हत्यारे फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी अमर बसवराज जमादार (वय 20 रा. गोपाळपट्टी, मांजरी), अमन अशोक नरोटे (वय 19), श्रीपती संतोष सरोदे (वय 19) यांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींवर आयपीसी 307, 341, 324, 323, 504, 506, 427, 34, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलिस अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमोल राजाराम घाटे (वय-25 रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर रोजी माळवाडी परिसरात घडला होता.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ९५वी कारवाई आहे.

मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…

मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…

मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!