मोठा कांड! रुग्णालयात शेकडो नागरिकांची गरज नसतानाही केली शस्त्रक्रिया…

अहमदाबाद (गुजरात) : एका हॉस्पिटपलमधील धक्कादायक समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गरज नसताना हेल्दी लोकांची हार्ट सर्जरी केली आणि हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

जामनगरच्या जेसीसी हार्ट इन्स्टिट्यूटमधील हा प्रकार घडला आहे. दीड वर्षात 800 शस्त्रक्रिया आणि त्याचं एकूण 6 कोटी रुपये बिल झाले. या शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केल्याचे सांगत हे बिल आरोग्य विभागाला पाठवण्यात आले. पण शस्त्रक्रियेचा आकडा आणि बिल पाहून काहीतरी गडबड असल्याचा संशय आरोग्य विभागाला आला आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

प्राथमिक तपासणीत धक्कादायक माहिती उघड झाली. अशा 105 लोकांना स्टेंट बसवलं, जे पूर्णपणे निरोगी होते. डॉ. पार्श्व वोराने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पैसे लाटण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या इतर संचालक आणि भागीदारांना काही कळू नये म्हणून त्याने आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांच्या ऑनलाईनसह सर्व प्रवेश प्रक्रियेची माहिती स्वत:कडेच ठेवल्याचा आरोप आहे. औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना रुग्ण पाठवल्याबद्दल 20% कमिशन दिले जाते, असेही तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आता या रुग्णालयाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून काढून टाकण्यात आले आहे, तसंच 6 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डॉक्टरलाही निलंबित केल्याची माहिती आहे.

मोठी बातमी! डॉक्टरच्या घरातून ३०० किलो RDX, AK-४७ रायफल, शस्त्रसाठा जप्त…

पुणे! विद्येच्या माहेरघरात तोतया डॉक्टर चालवत होता तब्बल 32 वर्षे दवाखाना…

नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…

सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…

धक्कादायक! CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!