
प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; चिमुकलीनं सगळं सांगितलं…
मुंबई: प्रियकरासह पत्नीने मिळून पतीला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, फरार असलेल्या तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.
मुंबईतील आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर येथे राहणारे भरत अहिरे (वय ४०) फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्याची पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर चंद्रशेखर यांनी मिळून भरत अहिरे यांचा जीव घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्रीने तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांना 12 जुलैच्या रात्री फोन केला आणि बोलावून घेतले. पतीला मारण्याचा कट रचला. भरतची 12 वर्षांची मुलगी श्रेयाने पोलिसांना सांगितले की, आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले, जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटल्याचे सांगितले. या घटनेनंतर पत्नी राजश्री अर्धमेल्या अवस्थेत भरतला धमकी देत राहिली की जर त्याने कोणाला सांगितले तर ती मुलांनाही मारून टाकेल. त्याला तीन दिवस घरात लपवून ठेवण्यात आले आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा 16 जुलै रोजी भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच ऑपरेशन्सनंतरही ते वाचू शकला नाही आणि 5 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
आरे पोलिसांनी खून आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करून पत्नी राजश्री आणि आरोपी रंगाला अटक केली आहे, तर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे. या घटनेनं संताप व्यक्त होत आहे. महिलेच्या दोन मुली आणि 3 वर्षांचा मुलगा महिलेच्या क्रूरतेचे साक्षीदार बनले. त्यांनी नातेवाईकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. पोलिसांना राजश्रीच्या दाव्यावर शंका आली. पोलिसांनी मुलांशी याबाबत संवाद साधला तेव्हा सत्य बाहेर आले. भरतचा मृत्यू 5 ऑगस्ट रोजी झाला. पोलिसांनी राजश्रीला हत्येचा कट रचल्याच्या आणि जाणून बुजून तिच्या पतीला मरू दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रियकर दिराने महिलेला जाळण्याआधी काय-काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड…
धक्कादायक! डॉक्टर जावयाने सासूचा खून करून मृतदेहाचे केले १९ तुकडे; कारण…
धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध…
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

