मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी तसेच जबरी चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील भुरिया टोळी विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९० टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख सुंदरसिंग भायानसिंग भुरिया (वय २५), मुकेश ग्यानसिंग भुरिया (२७), सुनील कमलसिंग आलावा (२८), हरसिंग वालसिंग ओसनिया (२२, सर्व रा. पिपरानी, कुक्षी, मध्यप्रदेश) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

६ ऑक्टोबर रोजी बोपोडी परिसरात अयोध्यानगर येथे सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करुन रोकड चोरुन नेली होती. भुरिया टोळीने शहरात यापूर्वी घरफोडीचे गुन्हे केले होते. भुरिया टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदूम, संतोष भांडवलकर यांनी तयार केला होता. परिमंडळ चारचे उपायुक्त शशिकांत बोराटे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी भुरिया टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले. रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९० गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ८९वी कारवाई आहे.

मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…

मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!