
दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते. आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला तो ब्लॅकमेल करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता एससी, एसटी कायद्यांतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत.
आरोपी दाऊद शेख आणि यशश्री शिंदे हे एकमेकांना ओळखायचे. यशश्री शिंदे ही दाऊद शेख याला भेटायला गेली होती. मात्र त्या दोघांत वाद झाला. शेवटी रागाच्या भरात दाऊदने तिच्यावर चाकूने वार केले आणि यातच यशश्री गतप्राण झाली. हत्येनंतर दाऊद घटनास्थळावरून पळून गेला. त्याने थेट कर्नाटक गाठले. कर्नाटकहून तो केरळमध्ये जाणार होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला केरळला पळून जाण्यापूर्वीच कर्नाकटमध्ये पकडले.
दाऊद शेख याच्याकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते, असा दावा केला जात आहे. आक्षेपार्ह फोटोंच्या मदतीने दाऊद यशश्रीला ब्लॅकमेल करायचा. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी उरणला आला होता. 25 जुलै दाऊद आणि यशश्री एकमेकांना भेटले होते. पण याच भेटीत दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात दाऊदने तिची हत्या केली. घटनास्थळी तिचा फोन आढळून आलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी दाऊदने तो लपवला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस याच फोनचा शोध घेत आहेत. यशश्रीचा फोन आढळल्यास त्यातून अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. कदाचीत याच फोनमधील चॅटिंग किंवा अन्य संभाषण या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते.
दरम्यान, यशश्रीच्या मित्राने तिला दाऊदला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता. दाऊद हा मानसिक धक्क्यात आहेत. त्यामुळे त्याला भेटणे योग्य नाही, असे त्याने यशश्रीला सांगितले होते. पण भेटीतून काही मार्ग निघेन असे यशश्रीला वाटले होते. त्यामुळे ती दाऊदला भेटायला गेली होती. मात्र दाऊदने चाकूने तिची हत्या केली.
Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…
यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…
प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…
पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…
नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

