निलंबित API सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण…

पंढरपूर: निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42, रा. वासूनद, ता. सांगोला) यांचा 3 ऑगस्ट रोजी वासूद परिसरात अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत मुंबई पोलिस दलातील सुनील मधुकर केदार (मुळगाव वासूद, ता. सांगोला) या पोलिसाला अटक केली आहे.

निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे ३ ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजणेच्या सुमारास जेवण झाल्यानतंर चालण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नव्हते. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता. दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी सकाळी चंदनशिवे यांचा सांगोला-वासूद रस्त्याच्या बाजूला अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती.

सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 15 दिवसांच्या तपासानंतर सांगोला पोलिसांच्या हाती खूनाचे धागेदोरे लागले आहेत. संशयित आरोपी सुनील‌ केदार यांना सांगोला पोलिसांनी आठ दिवसापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सुनील‌ केदार व विजय केदार या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली. पोलिसाच्या खुनामध्ये पोलिस दलातील व्यक्तीचाच सहभाग असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!