पुणे! न्यायालयातून पलायन करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात…

पुणे : शिक्षेचा निकाल ऐकताच न्यायालयातून पलायन करणारा आणि पोलिसांना चकवा देत अनेक ठिकाणी लपून बसणारा सराईत गुन्हेगार अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. कोथरुड) याला शिवाजीनगर पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका फरार गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे.

अनमोल जाधवराव याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या (गु. र. नं. ४०१/२०१२, कलम ३०७, आर्म अ‍ॅक्ट, म.पो.का.) गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र निकालानंतर न्यायालयाच्या आवारातून तो पलायन करण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी दिनांक १९ जुलै २०२५ रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा (गु. र. नं. ११०/२०२५, BNS कलम २६२) दाखल केला होता.

पोलिस तपासात समोर आले की, आरोपी अनमोल जाधवराव वेगवेगळ्या वेषात नाशिक, मुंबई, सातारा, सांगली आणि पुण्याच्या मुळशी, हवेली, पौड परिसरात लपून राहत होता. टीव्हीवरील गुन्हेगारी आधारित मालिका पाहून त्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक युक्त्या अवलंबल्या. दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनमोल जाधवराव वाघोली दिशेने येत असल्याचे समजताच पोलिसांनी खांदवे नगरमधील कावेळी हॉटेल समोर सापळा रचून एका चारचाकी वाहनास अडवले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने प्रथम खोटे माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याची ओळख उघड झाली.

तपासादरम्यान अनमोल जाधवरावने कबूल केले की, त्याने क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया अशा मालिकांमधून पोलिसांच्या तपासपद्धती शिकून त्यानुसारच आपली हालचाल आखली होती. तो १००-१५० किमी अंतर चालून, लोकांचा फोन मागून आप्तांशी संपर्क साधत असे आणि सतत आपले ठिकाण बदलत असे.

गाडीतील दुसऱ्या व्यक्तीची ओळख अक्षय संजय हंपे (वय ३०, रा. भिगांर, अहिल्यानगर) अशी असून तोही भिगांर कॅम्प पोलीस ठाण्यातील (गु. र. नं. ६१२/२०२५, BNS कलम १०९, ३(५)) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अनमोल जाधवराव याच्यावर यापूर्वीही चतु:श्रृंगी व कोथरूड पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, विनयभंग, शस्त्रसाठा, धमकी, सरकारी आदेशाचे उल्लंघन आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले, सहा. आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोनि धनंजय पिंगळे, पोउपनि अजित बडे, प्रमोद पाटील, पोना. सचिन जाधव, दीपक रोमाडे, दीपक चव्हाण, राजकिरण पवार, तसेच इतर कर्मचारी सहभागी होते.

पुणे शहरात अंमली पदार्थ टास्क फोर्सची स्थापना; पोलिसांची मोठी कारवाई…

माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध…

पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…

पुणे! वाघोली परसिरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून…

पुणे! स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!