महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
अकोला: महिला पोलिस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी उघडकीस आली आहे. वृषाली दादाराव स्वर्गे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.
वृषाली स्वर्गे या महिला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे निधन झालेले असून, त्यांना मुलबाळ नव्हते. वृषाली स्वर्गे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. वृषाली यांनी आज सकाळी राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जुने शहरचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त करून त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे.
दरम्यान, वृषाली यांच्या घराचा दरवाजा मंगळवारपासून बंद होता. अपार्टमेंटमधील काही नागरिकांनी घराचा दरवाजा वाजविला होता. पण, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय बळावला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, दरवाजा बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर वृषाली यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…