
कुडजे गावचे पोलिस पाटील यांच्याकडून गाव कोपरा बैठकीचे आयोजन…
पुणेः उत्तमनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडजे गावात पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी शुक्रवारी (ता. १४) संध्याकाळी गाव कोपरा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमनगर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे यांनी मार्गदर्शन केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे म्हणाले, ‘सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. तसेच लहान मुलांना मोबाइल देऊ नये. जास्तीत जास्त तरुणांनी पोलिस खात्यात येऊन जनतेची सेवा करावी. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागात परप्रांतीय भाडेकरूंची संख्या वाढली असून सर्वांनी सतर्क राहायला हवे. पोलिस जनतेचे मित्रच असून पोलिस तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत. तसेच पोलिस पाटील हा गृह आणि महसूल खात्याचा गावपातळीवरील महत्त्वाचा घटक असून त्यांनी सतत पोलिस स्टेशनच्या संपर्कात असायला हवे. संपूर्ण गाव एकत्र कसा राहील यासाठी पोलिस पाटील यांनी काम करायला हवे.’

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिस पाटील दत्ता पायगुडे म्हणाले, ‘गावात दोन राजकीय पार्ट्या असल्याने मला तारेवरची कसरत करावी लागत असून, मला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते. त्यामुळे गैरसमजातून काही लोकं माझ्यापासून दुरावतात याचा त्रास होतो. पण, मी याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण गाव माझा असून त्यांची काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो. भविष्यात संपूर्ण गावं एकत्र करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.’
सरपंच मानसी सोनवणे म्हणाल्या, ‘नदीमध्ये काही दुर्घटना घडल्यास पाण्यामधील मृतदेह शोधून काढण्यास भोई समाजातील लोकं स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांना मदत करतात. तसेच गावात शांतता असल्याचे सांगीतले.’
यावेळी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे, दहशतवादी विरोधी पथकाचे संग्राम केंद्र, गोपनीय माहिती विभागाचे मेजर बिटले, मेजर बनसोडे, कुडजे गावच्या सरपंच मानसी सोनवणे, पोलिस पाटील दत्ता पायगुडे, ग्रामपंचायत सदस्या सोनल घुमे, माजी सरपंच दशरथ घुमे, शिवभक्त अमित घुमे, प्रहार संघटनेचे दत्तात्रय घुमे, भोई समाज अध्यक्ष शैलेश घुमे, शिवभक्त अजित पायगुडे, युवा क्रिकेटर गणेश भोकरे, सामजिक कार्यकर्त्या राणी घुमे, मनपा कर्मचारी कैलास घुमे, राजेन्द्र घुमे आदी उपस्थित होते.
अगरवाल दांपत्यासह मकानदाराची येरवडा कारागृहात रवानगी…
मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

