पुणे शहरात साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना युनिट 4ने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात 2,10,000/-रुपयाचे साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणा-यांना युनिट 4ने मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

गुन्हे शाखा युनिट 4 चे पथक 18/01/2024 रोजी विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. खराडी बायपास जवळील दर्गा चौक येथे फॉरेस्ट पार्क रोडवर दोन जण पांढरे रंगाचे गोणीत काहीतरी संशयीत वस्तु घेऊन थांबल्याची खात्रीशीर बातमी पोलिस अंमलदार संजय आढारी व नागेशसिंग कुंवर यांना मिळाली. युनिट ४ कडील पथकाने तात्काळ सदर बातमीचे ठिकाणी जाऊन दोन्ही संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी केली. १) महेश रमेश पवार (वय १९ वर्षे रा. खराडी पुणे), २) अजय जयवंत कसबे (वय 24 वर्षे राहणार भीमा कोरेगाव पुणे) असे त्यांनी नावे सांगितले. त्यांचे कब्जातील पांढरे रंगाची गोणी पंचांसमक्ष तपासली असता, त्यामध्ये ६ हाईज (४०० वॅट प्रेशर मिड) व एक DP – 4065 डिपी मशीन ऍंम्प्लिफायर असे एकूण किंमत रुपये 2,10,000/- च्या साऊंड सिस्टीम च्या वस्तू दोघांनी चोरल्याची कबुली दिली आहे.

सदर बाबत खात्री केली असता चंदन नगर पोलिस ठाणे गु.र.नंबर 36/2024 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. सदर संशयीतांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईकामी चंदन नगर पोलिस ठाणे यांच्याकडे रिपोर्टर जमा केले आहे.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहायक पोलिस आयुक्त गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, सपोनि विकास जाधव, पो.उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार संजय आढारी, नागेशसिंग कुंवर, हरीश मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, अमोल वाडकर, शितल शिंदे या पथकाने केली आहे.

पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…

पुणे शहरात कार्यालयातील लाखो रुपये चोरणाऱ्याला युनिट ४ने ठोकल्या बेड्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!