मुंबईतील बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा वाढला; पाहा मृतांची नावे…

मुंबई : मुंबईतील कुर्ला आंबेडकर नगर येथे भरधाव जाणाऱ्या बेस्टने अनेकांना उडवले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले आहेत. कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरातून 332 क्रमांकाची बस अंधेरी कडे निघाली होती. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि तिने जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली. मद्यधुंद चालकाचा ब्रेकवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या बसचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत.

अपघातावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं, बसचा ब्रेक फेल झाला होता की बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता याबाबत अधिक तपास सुरू आहे. अपघातानंतर जमावाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचं देखील व्हिडीओद्वारे समोर आलं आहे. अपघात घडल्यानंतर बस चालक संजय मोरे याला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी धाडस दाखवत संजय मोरेला बाहेर काढले आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले. आमदार मंगेश कुडाळकर आणि मुख्यमंत्री सहायतानिधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी जखमी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे…
1. आफरीन अब्दुल सलीम शाह (वय 19)
2. अनम शेख (वय 20)
3. कनिस फातिमा गुलाम कादिर (वय 55)
4. शिवम कश्यप (वय 18)
5. विजय विष्णू गायकवाड (वय 70)
अन्य दोन जणांची नावे समजू शकलेली नाहीत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!