धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…

औरंगाबाद: भाऊजी आणि मेहुण्याने वेगवेगळ्या कारणांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून भाऊजीने विष प्राशन करून आत्महत्या केली तर मेहुण्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजू लिंबाजी गायकवाड (वय 32, रा. मृत राजू गायकवाड टाकळी अंतुर, ता. कन्नड) व विनोद शालिक बनसोड (वय 30 , रा. हट्टी, ता. सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या भाऊजी व मेहुण्याचे नाव आहे. टाकळी अंतुर-चिंचोली येथे राजू गायकवाड हे वास्तव्य करत होते. राजू यांचा अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण लग्नाला 11 वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने ते नैराश्यात होते. दरम्यान, राजू यांची पत्नी चार-पाच दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. राजू हे घरी एकटेच होते. शुक्रवारी सकाळी राजू यांनी शेतातील राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली.

दुसरीकडे याच दिवशी सिल्लोडच्या हट्टी येथील राजू गायकवाड यांचे मेहुणे विनोद बनसोडे यांनी देखील आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातीलच स्वतःच्या गॅरेजमध्ये विनोद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात काहीच पिकत नसल्याने त्यांनी स्वतःचा गॅरेज टाकले होते. बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केली होती. पण, नापिक आणि बँकेच्या कर्जासह इतर खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याची आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

निलंबित API सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण…

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

धक्कादायक! जावयाने धोंडे जेवणानंतर पत्नी आणि सासूचा केला खून अन् पुढे…

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!