प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…

सिंधुदुर्ग: गोवा म्हापसा येथील युवतीचा तिच्याच प्रियकराने खून करुन मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात आणून टाकला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे.

म्हापसा येथील कामाक्षी शंकर उदपानो (वय 21) हिचे आणि प्रकाश चुंचवाड (वय 22) यांचे प्रेम संबंध होते. मात्र, काही कारणांवरून या दोघांमधून भांडण झाले. यावेळी प्रकाश याने कामाक्षीच्या मित्र व मैत्रिणीच्या समोर कानशिलात लगावली होती. यावरून कामाक्षी हिने या प्रेम प्रकरणातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शिवाय, 29 ऑगस्ट रोजी म्हापसा येथील पोलिस स्टेशनला तक्रार देऊन आरोपी प्रकाशाला समज देण्यास सांगितले.

पोलिसांनी समज दिल्यानंतर प्रकाशला राग आला होता. त्याने कामाक्षी हिला 29 ऑगस्ट रोजी स्वतःच्या राहत्या फ्लॅटवर शेवटचे भेटण्यास बोलवले, कामाक्षी त्या ठिकाणी गेली. मात्र, प्रकाशने तिच्याशी भांडण करत तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह स्वतःच्या गाडीत भरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली या पर्यटन स्थळाच्या खोल दरीत फेकून दिला.

कामाक्षीचा भावाने 31 ऑगस्ट रोजी म्हापसा पोलिस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. म्हापसा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि प्रकाशला संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच प्रकाशने कामाक्षी हिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात मृतदेह फेकल्याचे कबूल केले. त्यानुसार प्रकाश याच्यावर मापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!