प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

मुंबई: प्रसिद्ध हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह याचे अवघ्या 25व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

पवन कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. त्याने आजपर्यंत अनेक हिंदी आणि तमिळमधील विविध मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पहाटे पाच वाजता त्याला हृदयविकाराचा झटका अल्याने त्याचे घरातच निधन झाले. पवन हा मुळचा कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील होता. नागराजू आणि सरस्वती असे त्याच्या आई-वडिलांचे नाव आहे. त्यांचे मुळ गाव हरिहरपुरा आहे. पवनचे पार्थिव मुंबईहून त्याच्या मूळ गावी मांड्या येथे नेण्यात येणार आहे, जिथे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर अंतिम संस्कार करणार आहेत.

दरम्यान, अलीकडच्या काळात मनोरंजन विश्वात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. लोकप्रिय कन्नड स्टार पुनीत राजकुमार याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. कन्नड अभिनेते विजय राघवेंद्र यांच्या पत्नी स्पंदना राघवेंद्र यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दोघेही थायलंडमध्ये असताना ही घटना घडली.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!