धुळे जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, युवतीचे अपहरण करून घेऊन गेले…
धुळे : साक्री येथे पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय युवतीचे अपहरण केल्यामुळे धुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटले. शिवाय, युवतीचे अपहरण केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
साक्री शहरातील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत वास्तव्यस असलेल्या ज्योत्स्ना पाटील (वय 40) आणि त्यांची भाची निशा शेवाळे या दोघी घरात टीव्ही पाहत होत्या. यावेळी घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आल्यामुळे दरवाजा उघडला. यावेळी घरात सहा अज्ञातांनी प्रवेश करत या दोघींना धारदार शस्त्राचा धाक दाखवला. त्यांच्या कपाटातील तिजोरीतून सुमारे 88 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशा शेवाळे अपहरण करून तिला सोबत घेऊन गेले. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
ज्योत्सना पाटील यांचे पती काही कामानिमित्त पाटील हे संगमनेर येथे गेले होते. ज्योत्सना घरी एकट्या असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला झोपण्यासाठी घरी बोलावून घेतले होते. निशा एका मेडिकल शॉपमध्ये काम करते. निशा व ज्योत्सना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असता रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावले होते.
खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…
Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ३० लाखांची मागणी; अडीच तासात ताब्यात…
कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…
नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!