नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…

नाशिकः गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन जणांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-यांना अटक करुन त्यांचेकडून ४,१०,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर, नाशिक येथे १५/०६/२०२४ रोजी रात्री ०२:४५ वाजेच्या सुमारास यश चंद्रकांत कोठावदे (वय २७, रा. फ्लॅट नं. ०१, सरस्वती अपार्टमेंट, साधूवासवाणी रोड, कुलकर्णी कॉलनी, शरणपुररोड, नाशिक) व त्यांचा मित्र वैभव असे त्यांची टियागो गाडी रस्त्याचे कडेला थांबवुन लघूशंका करत होते. यावेळी तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा जणांनी यश चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांचे टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजवून फिर्यादीचा मोबाईल फोन, अंगठी, गळयातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते. सदर बाबत गंगापुर पोलिस ठाणे येथे । गुरनं. १४९ / २०२४ भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ४२७,३४ प्रमाणे दि. १७/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील फिर्यादी यांचे पुरवणी जबाबावरून गुन्हयात भादंवि कलम ३९५ वाढीव कलम लावण्यात आले आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

सदर गुन्हयात फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोन मधून आरोपीताने फोन पे अॅपद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो सफल झाला नाही. सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेवून आरोपींचा मोबाईल नंबर मिळवून तो यश वसंत रणधीर (रा. कामटवाडे शिवार, नाशिक) याचे नावावर असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा अंबड पोलिस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांवी चाहूल लागल्याने तो त्याचे साथीदारांसह सदर ठिकाणाहून पळून उल्हास नगर व तेथून मालेगाव येथे गेल्याची गुप्तबातमी पोउनि पाटील यांना मिळाली.

मिळालेल्या बातमी प्रमाणे वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे पोउनि पाटील, पोअं/ गोरख साळुंके, सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थविल अशांनी कलेक्टर पट्टा मालेगाव येथे आरोपीतांचा शोध घेतला असता भूषण त्रंबक गोलाईत (वय १९), कृष्णा संतोष दळवी (वय २०, दोघे रा. सिडको नाशिक) असे मिळून आले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे उर्वरीत चार आरोपी पंचवटी व तपोवन परिसरात असले बाबत माहिती मिळाली सदर परिसरात पोउनि पाटील, पोअं / सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थविल, वाकचौरे अशांनी सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. सदर गुन्हयात निष्पन्न झालेल्या
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
१) भूषण त्रंबक गोलाईत, वय- १९ वर्षे, रा. खांडेकरनगर, माउलीलॉन्स, पवननगर सिडको, नाशिक
२) कृष्णा संतोष दळवी वय २० वर्षे रा. कोकणभवन, कामटवाडे, सिडको, नाशिक
३) निलेश सुनिल कुमावत, वय २१ वर्ष, रा. पाण्याच्या टाकीजवळ वॉचमन रुम मध्ये पवननगर सिडको नाशिक
४) आदिल आसिफ खाटीक, वय २० वर्ष, रा. तोरणानगर, उदरकॉलनी, गणपती मंदीराजवळ, पवननगर सिडको
५) यश उर्फ सोनु वंसत रणधीर, वय – १९ वर्ष, रा. कामटवाडा नाशिक
६) चंदु गोपाळ आवळे, वय- १९ वर्ष, रा. वनश्री कॉलनी, डी. जी. पी. नगर २ नाशिक
वरील नमुद ०६ आरोपींकडून सदर गुन्हयात बळजबरीने चोरून नेलेला मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. तो खालीलप्रमाणे
१) ८०,००० /- रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड
२) ४०,००० /- रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
३) ९०,०००/- रुपये किंमतीची काळया रंगाची होंडा स्प्लेंडर काळया रंगाची मोटारसायकल क्रमांक एम एच १५
जे क्यु ११४७
४) १०,०००/- रू किंमतीचा हिरव्या रंगाचा सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट
५) ९०,००० /- रु किंमतीचा काळया रंगाची बजाज प्लसर मोटारसायकल क्रमांक एम एच १५ एच झेड ८७७२
६) ९०,०००/- रू किंमतीची पांढ-या निळया रंगाची यमाहा कंपनीची आर १५ एम मोटारसायकल क्रमांक एम
एच १५ जे पी २७१३
७) १०,०००/- रू किंमतीचे आरमानी एक्सचेंज कंपनीचे घडयाळ जु.वा. किं.अं ४,१०,०००/- रुपये किंमतीचा एकुण येणेप्रमाणे वरील वर्णनाचा एकूण ४,१०,००० रूपये किंमतीचा मुदेदमाल आरोपीताकडुन हस्तगत करण्यात आला असुन आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींचे दाखल गुन्हयांचे रेकॉर्ड तपासले असता आरोपी क्रमांक १) भूषण त्रंबक गोलाईत, ३) निलेश सुनिल कुमावत यांच्यावर अंबड पोलिस ठाणे येथे गुरनं १२१ / २०२२ भादवी कलम ४३९, ३०७, ३२६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ – १, प्रशांत बच्छाव पोलिस उपायुक्त (गुन्हे) व सहायक पोलिस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गंगापुर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सपोनि / सोमनाथ गेंगजे, पोउनि / मोतीलाल पाटील, पोहवा / १०७८ रविंद्र मोहीते, पोना / १६९७ विनायक आव्हाड, पोशि/ १४४८ मच्छिंद्र वाकचौरे, पोअं. २२१५ रमेश गोसावी, पोशि/ १४३८ सोनु खाडे, पोशि/ २२४९ सुजित जाधव, पोशि/ २३०१ गोरख साळुंके, पोशि/ २७९८ विजय नवले, पोशि/ ९६० भागवत थविल, पोहवा/११५८गणेश रेहरे, पोहवा / १८३८ मधुकर सहाणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / सोमनाथ गेंगजे हे करीत आहेत.

नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…

नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…

नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!