
हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…
कोल्हापुरात ट्रॅव्हल्स उलटून पुण्यातील, एकाच कुटुंबातील तिघे ठार
पुणे: गोव्याहून मुंबईकडे भरधाव वेगात निघालेली खासगी ट्रव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवर पिरवाडी गावच्या हद्दीत पुईखडी वळणावर हा अपघात झाला आहे.
आई नीलू विराट गौतम (वय 46), मुलगी रिद्धिमा गौतम (वय 17) आणि मुलगा सार्थक गौतम (वय 13, सर्व रा. मांजरी बुद्रूक, जि. पुणे) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मनीत दरक (वय 17), प्रणव सावंत (वय 17), सचिन कदम (वय 37, तिघे रा. बोरिवली, मुंबई), आयुषमान मिश्रा (वय 17, रा. दहिसर, मुंबई), विश्वनाथ (वय 47, रा. मंगलोर, कर्नाटक) आणि चालक आनंद चव्हाण (वय 40, रा. विजापूर, कर्नाटक) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खासगी कंपनीची मुंबईला जाणारी स्लीपर कोच ट्रव्हल्स बुधवारी रात्री पणजी येथून निघाली होती. पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूरजवळ पुईखडी येथील वळणावर चालक निरंजनैया हिरेमठ याचे बसवरील नियंत्रण सुटले. भरधाव बस उजव्या बाजूला उलटून झालेल्या अपघातात विराट गौतम यांची पत्नी नीलू आणि मुलगी रिद्धिमा, मुलगा सार्थक मृत्यू झाला. अपघातानंतर करवीर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. पोलीस निरीक्षक अरविंद काळे, अग्निशमनचे मनीष रणभिसे आणि त्यांच्या जवानांचे दोन तास मदतकार्य सुरू होते. विराट विठ्ठललाल गौतम (वय 55, रा. मांजरी बुद्रूक, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार बसचालक निरंजनैया हिरेमठ याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, मुलांच्या सुट्टी संपण्यापूर्वी दोन दिवसांची गोव्याची सहल करून पुण्यातील मांजरी बुद्रूक येथील विराट गौतम हे पत्नी, दोन मुलांसह घरी परत निघाले असताना अपघात झाला आहे. पत्नी व दोन मुलांचे मृतदेह घेऊन जाण्याची वेळ बापावर आल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…
हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…
हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…
हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!