हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

चेन्नईः मल्याळम मालिका चित्रपटांमध्ये अभिनय साकारणारी अभिनेत्री डॉ. प्रिया (वय ३५) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या निधनाने मल्याळम चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रिया हिच्या निधनानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता किशोर सत्या याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करुन प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘मल्याळम टेलिव्हिजन क्षेत्राला धक्का देणारा आणखी एक अनपेक्षित मृत्यू. काल हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचा मृत्यू झाला. ती 8 महिन्यांची गर्भवती होती. तिचे बाळ आयसीयूमध्ये आहे. तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. काल ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेव्हा अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. प्रियाच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या निधनानं ती खूप हादरली आहे. देव अशा चांगल्या लोकांसोबत इतकं क्रूरपणे का वागत आहे? रंजूषाच्या निधनानंतर, आणखी एक मृत्यू. जेव्हा 35 वर्षांचा माणूस जग सोडून जातो तेव्हा शोक देखील व्यक्त कसा करावा? हे कळत नाही. प्रियाच्या नवऱ्याला आणि आईला या संकटातून कसे बाहेर काढायचे, माहीत नाही. त्यांच्या मनाला बळ मिळो.’

दरम्यान, किशोर सत्याने शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रिया ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. करुथमुथू या लोकप्रिय शोमध्ये तिने किशोरसोबत स्क्रीन शेअर केली होती. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याचे दिसले. प्रिया ही डॉक्टर होती.

दरम्यान, अभिनेत्री रंजूषा मेनन ही काही दिवसांपूर्वी तिरुअनंतपुरममधील तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. सोमवारी (ता. 30) सकाळी तिचा मृत्यू झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishor Satya (@kishor.satya)

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!