तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

तेजस्वी सातपुते या 2012 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांची आतापर्यतची कामगिरी पाहिली तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तव्य कठोरपणे राबवत असतानाच, पोलिस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यातून समाजामध्ये पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याबरोबरच, पोलिस कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य उंचावण्यासाठीही खूप चांगल्या पद्धतीने मदत झाल्याचे दिसून येते.

सर्वच अधिकारी कर्तव्यकठोर आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले दिसून येतात. त्‍यातल्या त्‍यात पोलिस विभागातील तर सर्वच अधिकारी. जनतेला खाकीशी एकरूप करण्यात गुंतलेले दिसून येतात. कोणताही दबाव सहन न करता सामान्यांच्या रक्षणासाठी त्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपणाऱ्या तेजस्वी सातपुते यांच्या आज अखेर खाकी वर्दीतील कर्तव्याने साहजिकच जन सामान्यांच्या मनात वेगळी उंची गाठली आहे. धाडसी आणि समाजाभिमुख कामांमुळे महाराष्ट्र पोलिस दलातील लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख आहे. संघर्ष व जिद्द ठेवून आयपीएस झाल्यामुळे आजच्या तरुणांमध्ये त्यांची वेगळीच क्रेज आहे. आपले कर्तव्य बजावताना, अवैध धंदे व गुन्हेगारी कंट्रोल ठेवण्यात तेजस्वी सातपुते नेहमी यशस्वी ठरतात. याच कर्तव्यासाठी पोलिस मित्र उदय आठल्ये यांनी घेतलेला आढावा.

अल्प परिचय…
तेजस्वी सातपुते यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील औरंगाबादच्या सीमेजवळ शेवगाव येथील. आई कृष्णाबाई सातपुते प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आहेत आणि वडील बाळासाहेब सातपुते हे व्यावसायिक आहेत. तेजस्वीच्या व्यक्तिमत्त्वावर त्याच्या पालकांचा खूप प्रभाव आहे. वडील खूप विचारशील व शांत संयमी असा त्यांचा स्वभाव आहे. आई डी एड करुन प्राथमिक शिक्षिका झाल्या. नोकरी करत करत तर बीए. अन एम. ए सुध्दा झाल्या. आता तर त्यांची पीएचडी करण्याची आकांक्षा आहे ! आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. यासाठी त्या सुरुवातीपासून आग्रही होत्या.

प्राथमिक शिक्षण…
तेजस्वी सातपुते यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. परंतु लहान वय असलेल्या तेजस्वी सातपुते यांचे शिक्षणाकडे लक्ष कमीच होते. यामुळे आई सारखी ओरडत असे. शिक्षणासाठी आईचा कित्येक वेळा मार पण खाल्ला आहे. आईच्या आग्रहाचं वर्णन करतांना तेजस्वी गंमतीने म्हणतात, माझी शाळा रोज दोन ठिकाणी भरायची. त्यात एक होती वर्गातली जी सर्वांची खरी शाळा असते आणि दुसरी होती घरची शाळा. असं असलं तरी लहानपणी अभ्यास माझ्या आवडीचा नव्हता. जास्त लक्ष खेळण्याकडे असायचे. पण याच बालवयात एक गोष्ट अशी घडली की, एकदम अभ्यास आवडीचा विषय बनला. त्याचं झाल असं, घरी अभ्यासाचा सराव करता यावा यासाठी व्यवसायमाला प्रश्नावली आईने आणल्या होत्या. याच वेळेस तेजस्वी सातपुते यांनी आपण काही तरी केले पाहिजे त्या दिवशी घेतलेला निर्णय त्यांचा आत्मविश्वास वाढवून गेला व प्राथमिक शाळेत चौथी मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तिथून खरा शाळेचा प्रवास सुरू झाला. दिवस सरत गेले तसे तेजस्वीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केली.

माध्यमिक शिक्षण व पदवीधर शिक्षण…
दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असला तरी वेगळी वाट त्या शोधत होत्या. नवीन आणि आव्हानात्मक काहीतरी करायचं असं त्यांनी मनाशी ठरवलेलं होतं. शिवाय आई वडील पाठिशी होतेच. वडील तर नेहमी म्हणायचे, तुला आवडेल असं काहीतरी कर, तुझ्या मनाविरुद्ध काहीच करु नकोस. सर्व साधारणपणे गुणवत्ता यादीत आलेल्या मुलामुलींचं प्रमुख ध्येय डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असतं. तेजस्वी यांचं मात्र असं नव्हतं. शाळेत असतांना त्यांना वैमानिक व्हावंसं वाटत होतं. त्याच कारण असं की, त्यांना शहीद वैमानिक निर्मलसिंग यांच्या जीवनावर एक धडा होता. त्या धड्यातून जे काही वैमानिकाच्या आयुष्याबद्दल उमजलं होत, त्या आधारावर त्यांच हे स्वप्न निश्चित झालं होतं. मात्र, हे स्वप्न त्यांना लवकरच विसरावं लागलं. अर्थात गैरसमजुतीमुळे म्हणा किंवा ग्रामीण भागात त्यावेळी मिळणार्‍या अपुर्‍या माहितीमुळे म्हणा. तर त्याचं असं झालं असं की, अकरावीत तेजस्वी यांना चष्मा लागला. चष्मा असला की, वैमानिक होता येत नाही असे त्यांना कोणीतरी सांगितले. त्यामुळे त्यांचे स्वप्न भंग पावलं.

१२ वी ला मिळालेले गुण सहजपणे मेडिकल किंवा इंजिनियरिंगला नंबर लागेल असे असतांना त्यांनी तेव्हा महाराष्ट्रात नवीनच सुरू झालेल्या बीएस्सी (जैवतंत्रज्ञान) या अभ्यास क्रमाला जायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. या पदवीत त्यांना उत्तम गुण मिळाले. याच कोर्स दरम्यान, बंगलोर येथे सी एन आर राव यांनी शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सुरू केलेल्या जेएनसी एएसआर या ३ वर्षांच्या संशोधनपर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली.

यूपीएससी प्रवास…
२००९ साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. आपली आवड ओळखून त्यांनी मराठी आणि इतिहास हे विषय मुख्य परीक्षेसाठी निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकलं. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली. दुसऱ्या प्रयत्नात २०१२ साली देशात १९८ क्रमांक मिळवून त्या आय पी एस झाल्या. यु.पी. एस.सी परिक्षेत यश संपादन केल्यावर त्यांच लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते. निकालानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान जो दोन ते तीन महिन्याचा कालावधी होता तेवढा काळ प्रपंच सांभाळला. ऑगस्ट २०१२ ला त्या मसुरीत प्रशिक्षणासाठी गेल्या. तिथं १०० दिवस त्यांचा फौडेशन कोर्स पुर्ण झाल्यावर हैद्राबाद येथील प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलिस अकादमीत पुढील प्रशिक्षण झालं .हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१४ या कालावधीत त्यांनी पुर्ण केलं. या प्रशिक्षणात देखील त्यांनी मोठं यश मिळवलं. या प्रशिक्षणात पोलिसांच्या नेतृत्वावर आधारीत होणार्‍या लेखी परिक्षेतील स्पर्धेच्या त्या मानकरी ठरल्या. अतिशय खडतर प्रशिक्षण आटोपून त्या महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्या.

खाकीच्या कर्तव्याचा प्रवास सुरू…
प्रशिक्षण संपवून त्या फेब्रुवारी २०१४ ते सप्टेंबर २०१४ या काळात परिविक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्याने त्यांचा परीविक्षाधिन कालावधी जळगाव अन् जालना अशा दोन जिल्ह्यात पुर्ण करावा लागला. त्यानंतर त्यांची नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून झाली.

जालना जिल्ह्यात पारधी समाजाचे पुनर्वसन…
जालना जिल्ह्यातील परतूर येथून त्यांनी प्रोबेशनच्या माध्यमातून सेवेला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जालन्याच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही सामाजिक परिस्थितीतील आव्हाने कायम आहेत. सातपुते यांनी प्रोबेशनच्या कालावधीमध्येही परतूर भागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यामध्ये पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. तिथे त्या डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ दरम्यान होत्या.

राज्य गुप्तचर विभागात कौतुकास्पद कामगिरी…
जालना जिल्ह्यातील पदभार यशस्वी झाल्यानंतर पुढे त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलिस अधीक्षक म्हणून झाली. या नेमणूकीच्या काळात त्यांच्याकडे ज्या जबाबदार्‍या होत्या त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) काम करताना विविध उपक्रम राबवले. आता वापरात असलेली एएमबीआयएस (AMBIS) हे तंत्रज्ञान वापरामध्ये आले. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये सातपुते यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या नेतृत्वाखाली एआयपीडीएम (AIPDM) स्पर्धेमध्ये राज्याला दुसरा क्रमांक मिळाला होता.

गुप्तचर विभागातून त्यांची बदली पुणे ग्रामीणला…
पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी झाली. या पदावर अतिशय कमी कालावधीमध्येही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. त्या काळातील अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय कुशलतेने आणि सक्षमपणे हाताळली. पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याबद्दल त्यांना चाकण एमआयडीसीकडून सन्मानितही करण्यात आले.

पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्तपदी उत्कृष्ट कार्य…
पुणे शहराच्या वाहतूक पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयोगांची चर्चा झाली. एखाद्या निर्णयाला नागरिकांचा विरोध असला, तरी तर्कशुद्धपणे जागृती केली आणि योग्य भूमिका मांडली; नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो, हे या काळातील त्यांच्या उपक्रमांमधून दिसून येते. दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पुण्यामध्ये हेल्मेटसक्तीचे निर्णय याआधी अनेक वेळा फसले आहेत. तेजस्वी सातपुते उपायुक्त असताना, हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या पुढाकाराने अल्पावधीमध्ये हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण अल्पावधीत २० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले. हेल्मेटच्या वाढत्या वापराचे सकारात्मक परिणामही काही काळातच दिसून आले. हेल्मेटच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे या काळातील शहरातील अपघाती मृत्यूचे प्रमाण ४० ते ४५ टक्क्यांनी कमी करण्यामध्ये यश आले होते. झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल तोडण्याविषयीच्या जागृतीविषयी त्यांनी विविध उपक्रम घेतले. त्यातून जनतेची जागृती केली आणि या समस्यांवर मात करण्यात पर्यायाने वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यामध्ये बऱ्याच अंशी यश आले होते.दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे होणारे उल्लंघन ही देशतील सर्वच शहरांमध्ये दिसून येणारी समस्या आहे. वाहतुकीचे नियम न पाळता, दुचाकी चालवल्याने फार वेळ वाचत नाही, असा त्यांनी केलेला प्रयोग देशभरात गाजला…

सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती…
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये सातारच्या महीला पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतला. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नंतर सातारला महिला पोलिस अधीक्षक म्हणून लाभलेल्या आयपीएस तेजस्वी सातपुते या दुसऱ्या महिला पोलिस अधीक्षक. त्यांची सातारा जिल्ह्यातील कारकीर्द ही संपुर्ण जीवनात अनमोल आहे व सर्व सामान्य जनतेच्या मनात न विसरणारी आहे.

सैनिकांसाठी एक दिवस…
‘सैनिकांचा जिल्हा’ अशी सातारा जिल्हयाची ओळख आहे. लष्करात कर्तव्य बजावणारे सैनिक मोजक्या दिवसांच्या सुट्टीसाठी गावी येतात, तेव्हा त्यांना अनेक कामांचा निपटाराही करावा लागतो. या कामांमध्ये सैनिकांचा वेळ जातो. अशा सैनिकांच्या पोलिस दलाकडील कामांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा, यासाठी ‘सैनिकांसाठी एक दिवस हा उपक्रम सुरू केला. या कामांमुळे सैनिकांच्या रखडलेल्या कामांचा निपटरा तातडीने होऊ लागला. त्यामुळे, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

पोलिसांसाठी उभारले कोविड सेंटर…
कोविडच्या साथरोगाच्या सुरुवातीचा काळ पोलिस दलासाठी सर्वात आव्हानात्मक होता. या काळामध्ये कोरोनाची अंमलबजावणी करत असताना अनेक पोलिस एकाच वेळी बाधित झाल्याचे आढळत होते. या बाधित पोलिसांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सेवन सज्ज असे ३५ बेडचे सुसज्ज रुग्णालय केवळ पाच दिवसांमध्ये उभारले. कोविड काळामध्ये केवळ पोलिसांसाठी उभारण्यात आलेले हे एकमेव रुग्णालय आहे.

तेजस्वी सातपुतेंचा सन्मान…
सातारा जिल्हा पोलिस प्रमुख कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान. साताऱ्यात कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काचं हॉस्पिटल मिळावं म्हणून चैतन्य पोलिस ऑक्सिजन हॉस्पिटल निर्मितीसाठी आपण पुढाकार घेतलात. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हिटॅमिनच्या गोळ्या, मास्क मिळवून दिलेत. कोरोना काळात जनतेच्या मनातून भीती दूर करण्यासाठी आपण प्रभावी जनजागृती केली म्हणून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल व मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत मध्ये पुरस्कार प्रधान करण्यात आला..‌

खाकी वर्दीच्या आड माणुसकीचा झरा….
सातारा जिल्हा पोलिस दलातील आपल्या पोलिस दलातील एक जवान.गमावल्याची खंत जिल्हा पोलिस प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या मनात आज ही आहे. अनेक पोलिसांची काळजी त्या स्वताः घेत होत्या वाई पोलिस दलातील जवान गजानन ननावरे यांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न जिल्हा पोलिस प्रमुखांनी केला होता..व मुलीला तिच्या इच्छेप्रमाणे डाँक्टर करुया या साठी मी नक्की प्रयत्न करणार असे आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी सांगितले व कूटूंबियानां मोठा दिलासा दिला.

हनूमंत गायकवाड यांना दिला पुनर्जन्म…
दिनांक 16/7/2020 रोजी हनूमंत गायकवाड हे नेहमी प्रमाणे पोलिस स्टेशनला हजर झाले. त्या अगोदर दोनच दिवस खंबाटकी घाटात प्रेमीयुगलांना लुटमार करणारी टोळी तपास पथकाने पकडली होती. याच गुन्ह्यांची मोठी उकल करत असताना संपूर्ण पोलिस टिम कोरोना विसरली होती. परंतु कोरोनाने सहाय्यक पोलिस निरीक्षक हनूमंत गायकवाड यांना 18 तारखेला गाठलेच व प्रवास सुरू झाला उपचार मिळवण्यासाठीचा. कोविडचा रिपोर्ट बाधित येताच अनेक सहकारी वर्गाने साथ सोडल्यासारखी झाली होती. घरचे पण हतबल झाले होते, टेन्शनने खचून गेले होते. परंतु, या सगळ्यात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते कुटुंबप्रमुखाची जवाबदारी पेलली व वाईमध्ये बेड उपलब्ध करून दिला. दोन दिवस उपचार झाले तिसऱ्या दिवशी मात्र गायकवाड यांची तब्येत खालवली. ऑक्सीजन लेवल 82-83 होऊ लागली. गायकवाड यांच्या परिस्थितीवर स्वतः तेजस्वी सातपुते लक्ष ठेवून होत्या. अखेर सातपुते मॅडम यांनी यंत्रणा गतिमान करत. पुण्याला नामांकित नोबेल हॉस्पिटल येथे बेड मिळवून दिला. बेड मिळाला पण रेमडीसेवर इंजेक्शन शिवाय पर्याय नाही, असे त्यांना सांगितले. त्यावर सातपुते यांनी “तुम्ही निश्चितं राहावा काळजी करू नका…मी ताबडतोब PSI वाघ वेल्फेअर यांना पुर्णपणे नियोजन करण्यासाठी सांगते.

प्रवासाचा कालावधी वगळता कोणतीही दिरंगाई होणार नाही. इंजेक्शने आजच पुण्यात नोबेल हाँस्पिटला पोलिस वाहनांतून तातडीने पोहोच केली जातील तुम्ही टेन्शन घेवू नका” हे मँडमचे आधाराचे शब्द ऐकून डोळे पाण्यानं भरून आले. सकाळी 11.00 वा इंजेक्शन चा मेसेज मी मँडम ना दिलेनंतर वरील “सहा ही इंजेक्शन” घेवून दुपारी 14.30 वा. नोबेल हाँस्पिटल हडपसरला पोहचली आणि पुढील उपचार तातडीने सुरू करणेस डॉक्टरांना मँडमनी स्वतः फोनद्वारे सांगितले. इंजेक्शन आणली आहेत असे जेव्हा डॉक्टरांना सांगितले त्यावर त्यांचा विश्वास बसेना. अवघ्या तीन तासाच्या आत सातारा येथून इंजेक्शन पुण्यात उपलब्ध करून दिली व उपचार सुरू होऊन गायकवाड सुखरूप बाहेर आले.

तेजस्वी सातपुते कोरोना बाधित…
जिल्हा पोलिस दलाची काळजी घेतल्यानंतर कोरोनाने तेजस्वी सातपुते यांना पण लक्ष्य केले. सातपुते यांनी आधीपासून काळजी घेतली होती.परंतु फिल्डवर जात कोविडच्या काळात तेजस्वी बाणा काय आहे. हे सातारा जिल्ह्याने अनुभवले आहे.

राजधानीने बघितले तेजस्वी सातपुते यांचे अनेक पैलू…
दिड वर्षाच्या काळात सातारकरांनी तेजस्वीचे अनेक पैलू बघितले आहेत.आपल्या सूमधूर आवाजात गाणे गायलेले असूदेत..किंवा आपली चित्रकला असो.. गुन्हेगारी वर्गावर कारवाई करताना आक्रमक बाणा असूदे.किंवा टोल वरुन रीलायन्सला भरलेला दम असूदेत, हळव्या मनाने पोलिस समारोप कार्यक्रमात डोळ्यांत आलेले अश्रू असूदेत हे सगळे जमते याला योग्य समन्वय म्हणतात…

सातारला गुन्हेगारी विरोधात धडक कारवाई…
तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा पोलिस दल चांगले चार्ज ठेवले होते साधारण दिड वर्षात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले. साधारण 270 घ्या आसपास गुन्हेगार हद्दपार केले होते. सातारचा चार्ज घेताच लोकसभा व त्यानंतर विधानसभेबरोबर पुन्हा लोकसभेची पोट निवडणूक झाली. या तिन्ही निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले होते.

सातारा ते सोलापूर ग्रामीण बदली…
सोलापूर ग्रामीण पोलिस दलात रुजू झाल्यानंतर कोविडचा खेळ पुन्हा सूरू झाला.. सोलापूर ग्रामीण पोलिस दलात 30 ब्रेडचे कोविड सेंटर उभारले व आपल्या पोलिसांना उपचार घेण्यास मदत झाली. तेजस्वी सातपुते यांच्यात आज अखेर पदाचा अर्विभाव दिसला नाही, नेहमीच मनाचा मोठेपणा दिसला आहे. सहकारी वर्गाची काळजीला नेहमीच दिले प्राधान्य..कोविडचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णास उपचारांबरोबरच मानसिक आधाराची ही तितकीच गरज असते उपचार व्यवस्थित असताना सुद्धा मानसिक आधार न मिळाल्यास रुग्ण खचून जातो. या गोष्टीचे भान ठेवून सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम या वळसंग पोलिस स्टेशनला कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश ढाले यांच्या तब्येतीची विचारपूस करायला थेट अश्विनी हॉस्पिटल सोलापूर च्या कोवीड वॉर्ड मध्ये पीपीई किट परिधान करून आल्या. यावेळी सगळे आश्चर्यचकित झाले होते.

तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन…
दारुच्या व्यसना पासून स्वतः सोबत आयुष्य पणं उध्वस्तं झालेली कुटुंब आपण बघितली आहेत. सोलापूर ग्रामीणच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या नेहमी काही तरी वेगळ्या संकल्पना राबवत असतात. या वेळी दारु बाबत परीवर्तन करणे व जनजागृती करणे. त्या कुटुंबातील सदस्यांना चांगले समूपदेशन करणे व त्यांचा निर्णय बदलणे या साठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहात. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री सुरू आहे. या दारूमुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना आपल्या प्राणास मुकावं लागत आहे. या दारू अड्ड्यांना पायबंद घालण्यासाठी वारंवार कारवाई झाली. मात्र अवैध हातभट्टी दारु निर्मितीच्या धंद्यातील गुन्हेगारांनी जागा बदलून आपले अवैध धंदे सुरूच ठेवले. त्यामुळे यावर कायमचा उपाय म्हणून सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी समूपदेशन करत अनेकांचे संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे नक्की..तेजस्वी सातपुते यांनी खाकीच्या आड आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी जपली आहे हातभट्टीच्या जागेवर चिमुकल्यासाठी मैदान,मुळेगाव तांड्याची ओळख पुसण्यासाठी पोलिस अधीक्षकांचा पुढाकार.

सोलापुरातील ‘ऑपरेशन परिवर्तन यशस्वी…
हातभट्टीच्या दारूचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन हाती घेतले. पिढ्यानपिढ्या गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या आणि एका अर्थाने समाजाने वाळीत टाकलेल्या आतापर्यंत ३२७ कुटुंबाचे या मोहिमेमध्ये पुनर्वसन करण्यात आले. यामध्ये या कुटुंबातील सदस्यांना नोकरी, किराणा दुकान, चहाची टपरी, रिक्षा अशा स्वरूपाच्या व्यवसायात सक्रियपणे पुनर्वसन केले आहे. पोलिस दलातील कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आतापर्यंत ३००० हून जास्त.समुपदेशनाची सत्रे घेण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन परिवर्तन या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या प्रारुपाच्या साह्याने हातभट्टीच्या दारूच्या उत्पादन वापराचे प्रमाण जवळपास ८०-८५ टक्के कमी करण्यात या ‘झिरो बजेट’ उपक्रमांतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्याचबरोबर अनेक पिढ्यांपासून या व्यवसायामध्ये असणारे लोक आता नव्या आणि चांगल्या मार्गावर रुळली आहेत, ही पोलिस दलासाठी अभिमानास्पद बाब आहे. हे अभियानही आता राज्यभर राबविण्याबाबत मा. पोलिस महासंचालक यांनी निर्देश दिले आहेत…समाजोपयोगी प्रयोगशीलता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य राहिलेले दिसते.

रोजगार मेळावा…
पोलिस वेल्फेअर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पोलिस दलातील कुटुंबांचे पाल्य, पारधी समाजातील पाल्य आणि हातभट्टी दारू विकणाऱ्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रमातील कुटुंबियांचे पाल्य अशा एकूण ६५७ युवकांना नोकरी उपलब्ध करून दिली. किमान १० हजार ते कमाल ४० हजार रुपये अशा रेंजमधील मानधनाच्या या सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमधील नोकऱ्या आहेत

कार्याची दखल…
केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी लोक प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या ऑपरेशन परिवर्तनला जाहीर झाला..

राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे हे सोलापूर ग्रामीण दौऱ्यावर असताना ऑपरेशन परिवर्तन व तेजस्वी सातपुते यांचे जाहीर कौतुक केले होते ..

इंडिया पोलिस समिट आणि ॲवार्ड-२०२२अंतर्गत १५ जुलैला आयोजित केलेल्या दुसऱ्या आभासी आवृत्तीत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात राबविलेल्या ऑपरेशन परिवर्तनला पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध नवभारत वृत्तपत्राकडून उत्तम कामगिरीसाठी राज्यपालांच्या हस्ते सन्मान..

ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमाचे अभूतपूर्व यश पाहता सरकारच्या वतीने मा. पोलिस महासंचालक यांच्याकडून राज्यातील सर्व जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत…

पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांचे सर्व स्तरातून कौतुक सूरू नुकतेच राज्याचे गृहमंत्री नामदार श्री.दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी पण कौतुक केले ..

जॉब फेअरमध्ये असलेले सातत्य…
ऑपरेशन परिवर्तन, पारधी समाजातील सुशिक्षित तरूण आणि पोलिसांच्या पाल्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी, त्यांच्यासमोरील अडचणी कायमस्वरूपी दूर व्हाव्यात, यासाठी सातत्याने पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरु राहतील,
सर्वसामान्य माणसांत सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिमा चांगली
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील 25 पोलिस ठाण्याकडील 500 हून अधिक लोकांना त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत देण्यात आला आहे. 5 कोटींहून अधिकचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आल्याने जनमानसात सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

तस्करांवर कारवाई…
सोलापूर ग्रामीणचा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर सुरुवातीला काही दिवस जिल्हा समजून घेतल्य़ानंतर त्यांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली वाळूतस्करी व तस्करीतून होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलली . त्यामुळे वाळू तस्करांवर सातत्याने कारवाई झाल्याने वाळूतस्करी रोखण्यास मदत झाली. तर सातत्याने वाळूतस्करीचे गुन्हे करणाऱ्यांना तडीपार करणे, एमपीडीएनुसार स्थानबद्धतेच्या कारवाई करण्यात आपली भुमिका महत्वाची आहे.

सोलापूर ग्रामीण ते मुंबई बदली…
तेजस्वी सातपुते यांनी पोलिस अधीक्षक म्हणून सोलापुरात केलेली कामगिरी कायम स्मरणात राहणारी आहे. त्यांचे ऑपरेशन परिवर्तन हा प्रयोग ब-यापैकी यशस्वी झाला होता. अनेक नेते, मंत्र्यांनी भेटी देऊन या प्रयोगाचे कौतुक केले होते. अवैध व्यवसायापासून परावृत्त करून त्या गुन्हेगारी व्यक्तीस चांगला व्यवसाय करण्यास मदत करणे या या परिवर्तन ऑपरेशनचा अर्थ होता.

पोलिस खात्यातील कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी करारी बाण्याचा तेजस्वीरत्न जात, पात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जावून कर्तव्य बजावत असतात. सर्व जाती धर्माच्या लोकांशी रक्ताच्या नात्याप्रमाणे नाळ जोडून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. अशा या पोलिस दलामध्ये असलेल्या रणरागिणींने स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. तसेच इतर स्त्रियांसमोर ही आदर्श निर्माण करून, त्यांना प्रेरित करून एक या क्षेत्रात येण्यासाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित केले आहे.

– उदय आठल्ये

पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…

वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!