हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…

यवतमाळ : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त दोन मुली मामाच्या गावाला आल्या होत्या. परिसरात खेळत असतानाच तलावात पडल्या आणि दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मनदेव गावा येथील जेतवनमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रिया किशोर बिहाडे आणि काव्या धम्मपाल भगत अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलींची नावे आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळच्या मनदेव गावा येथील जेतवनमध्ये ही घटना घडली आहे. तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या घरी आल्यानंतर कुटूंबासह जेतवनला भेट देण्यासाठी गेली होती.

परिसरात खेळत असताना दोन्ही मुली अचानक तलावात पडल्या. त्या पाण्यात बुडू लागल्या. मुली पाण्यात बुडत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तलावाकडे धाव घेतली. त्यांना तलावाच्या बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत या दोघींचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मुलींच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!