अक्कलकोटवरुन परतताना कार दरीत कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू…

जळगाव : अक्कलकोटवरुन परतताना भाविकांची कार दरीत कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे.

देवदर्शनावरुन परतत असताना चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीला अपघात झाला आहे. गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रविवारी (ता. २६) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला एक पुरुषाचा समावेश आहे. गाडीतील सर्वजण हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जखमींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मालेगावातील हे सर्वजण तवेरा गाडीने अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. रविवारी रात्री गाडीने सर्वजण मालेगावला येत होते. मात्र कन्नड घाटात धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
प्रकाश गुलाबराव शिर्के (वय – 65)
शिलाबाई प्रकाश शिर्के (वय – 60)
वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय – 35)
पूर्वा गणेश देशमुख (वय – 08)

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

धुळे जिल्ह्यात सशस्त्र दरोडा, युवतीचे अपहरण करून घेऊन गेले…

भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…

सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!