धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या नादात मुलगा पडल्याचा मेसेज आईने वाचला अन्…
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ब्लु व्हेल गेमचं व्यसन जडले होते. व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येने झाला आहे. या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना किवळे भागात घडली आहे.
मुलाने 26 जुलै रोजी रात्री घराच्या इमारतीवरुन उडी घेतली आहे. मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. अचानक मुलामध्ये झालेला बदल पाहून आई-वडीलही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळे 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर आला. जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीत जाऊन बसला. आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्यामुळे त्याची काळजी घेतल होते.
दरम्यान, सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला. आई खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचल्यानंतर धक्का बसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
दरम्यान, घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेले काहीतरी आढळले. मात्र, यातून त्याला काय नमूद करायचे होते, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत. ब्लु व्हेल सारख्या गेममुळे मुलाचा जीव गेल्यामुळे अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. मुलांमधील मोबाईल व गेमिंगचे व्यसन ही चिंतेची बाब बनली आहे. पालक व शिक्षकांनीच यातून मार्ग काढला पाहिजे, असेही मत अनेकजण व्यक्त करत आहेत.
पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
धक्कादायक! परदेशी महिलेला जंगलात साखळीने झाडाला बांधलं…
हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…
भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…