
महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…
वाशिम : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश काकाराव अढागळे वीरमरण आले आहे. 6 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना हिमस्खलन होऊन त्यांचा उंच डोंगरावरून 1 हजार फुटाहुन अधिक खोल दरीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लष्करी इस्पितळात औषधोपचार सुरू होते. मात्र, रविवारी (ता. 10) रात्री त्यांना वीर मरण आले.
आकाश अढागळे हे 2010 साली भारतीय सैन्यातील महार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. देशाची सेवा करत असताना शिरपूरच्या या शूर सैनिकाला आलेल्या वीर मरणामुळे शिरपूरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आकाश अढागळे हे येत्या 15 दिवसात गावी येणार होते. त्यांचे 4 सप्टेंबर रोजी कुटुंबियांसोबत मोबाईलवरून झालेले संभाषण अखेरचे ठरले आहे.
आकाश अढागळे यांचे मोठे भाऊ नितीन अढगळे हे भारतीय सीमा सुरक्षा दलात आसाम मधील चिन सीमेवर सेवा देत असून त्यांचे लहान भाऊ उमेश अढागळे हे देखील महाराष्ट्र सुरक्षा बलात कर्तव्य बजावत आहेत. आकाश अढागळे यांच्या मागे आई, पत्नी रुपाली त्यांची चार वर्षीय मुलगी तन्वी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. आकाश अढागळे यांच्या पार्थिवाला लेहच्या लष्करी मुख्यालयात सकाळी मानवंदना दिली जाईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीच्या लष्करी मुख्यालयात आणल्यावर तिथे लष्करी मानवंदना देऊन विमानाने नागपूरला आणले जाईल.
नागपूरवरुन लष्कराच्या गाडीत पार्थिव शिरपूर गावात आणले जाणार आहे. नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी ते ठेवले जाणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…