शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…

सोलापूर : नवीन घेतलेल्या कारचे पेढे वाटण्यासाठी मेव्हण्याकडे गेलेल्या शिक्षकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झाला आहे. इराण्णा झुजगार असे या शिक्षकाचं नाव आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी पाच दिवसांपूर्वी कार खरेदी केली होती. कारचे पेढे वाटण्यासाठी ते मेव्हण्याच्या गावी गेले. कार सावलीत पार्क करत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार बाजूलाच असलेल्या विहिरीत कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील भाटेवाडी गावात ही घटना घडली आहे.

शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांना रविवारची सुट्टी असल्यामुळे ते भाटेवाडी येथे मेव्हण्याला पेढे वाटण्यासाठी आले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते भाटेवाडीमध्ये पोहोचले. गाडी पार्क करून कारचा चालक आणि त्यांचे कुटुंब घरात गेले. मात्र, त्याचवेळी ईरन्ना हे ड्रायव्हर सीटवर बसले होते. त्यांनी गाडी सावलीत पार्क करण्यासाठी स्टार्ट केली. मात्र याचवेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार शेजारीच असलेल्या विहिरीत कोसळली.

दरम्यान, घटना लक्षात येताच कुटुंबाने विहिरीकडे धाव घेतली, त्यांना पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इराण्णा यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!