कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…
पुणे: युवतीचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे नऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवतीने (वय १९) लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत असून त्यांच्यात मैत्री आहे. आरोपीने फिर्यादीला काहीही न सांगता त्याच्या गाडीवर बसवून पुणे स्टेशन येथे घेऊन गेला. तेथून पनवले येथे नेले. तेथे लॉजवर तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिला बाणेर येथील लॉजवर आणून तेथेही तिच्याशी शारीरीक संबंध केले.
दरम्यान, युवतीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तबरेज शेख याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक बनसुडे पुढील तपास करीत आहेत.
मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…
नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…
प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…