विवाहापूर्वी हॉटेलमध्ये मित्रासोबत गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह ठरल्यानंतर खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवतीचा गाझियाबादमधील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान ती मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे.

शहजादी (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. शहजादी हिचे पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील एका युवकासोबत लग्न होणार होते. मागील शुक्रवारी युवती तिचा मित्र अजरुद्दीनसोबत लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली. डासनाच्या अनंत हॉटेलमध्ये तिने मित्रासोबत रुम शेअर केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ त्यांना देण्यात आला. त्याच रुममध्ये दुसऱ्या दिवशी युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला. युवतीसोबत हॉटेलला थांबलेल्या मित्राने शहजादीचा भाऊ दानिशला या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी हॉटेलमधील युवतीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृत युवतीचा भाऊ दानिशने शहजादीचा मृत्यू नव्हे हत्या आहे आणि त्याने अजरुद्दीनवर हत्येचा आरोप केला. या घटनेनंतर शनिवारी रात्री अजरुद्दीने हॉटेलच्या स्टाफला रुमची चावी देऊन तिथून पसार झाला. सध्या पोलीस अजरुद्दीनचा शोध घेत आहे. शहजादीचा मृत्यूचा पोलिस तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…

हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!