प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…

नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलाचा (वय ११) मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे.

दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने दिव्यांश (बिट्टू) याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बिट्टूचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पूजा (वय २४) हिला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसर, प्रियकराने केलेल्या फसवणुकीमुळे पूजाच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात 10 ऑगस्ट रोजी दुपारी बिट्टू घरात झोपला असताना त्याचा गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृचदेह बेडमध्ये लपून ठेवला होता.

पूजा आणि जितेंद्र 2019 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन पुजाला दिले होते. परंतु, 2022 साली जितेंद्र पूजाला सोडून आपल्या पत्नीकडे परतला आणि पत्नी, मुलासोबत राहायला लागला होता. यानंतर पूजा चिडली होती. पूजा आणि जितेंद्रच्या नात्यामध्ये बिट्टू येत असल्याने जितेंद्र लग्नाला विरोध करत आहे, असे पूजाला वाटत होते. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी पुजाने हे पाऊल उचलले.

पुजा हिने मित्राच्या मदतीने जितेंद्रच्या घराचा पत्ता विचारला. त्यानंतर पूजा जितेंद्रच्या घरी पोहचली तर घराचा दरवाजा उघडा होता. पूजा ज्यावेळी घरी पोहचली त्यावेळी घरी कोणी नव्हते. बिट्टू त्यावेळी बेडवर झोपला होता. पूजाने घरात कोणी नाही ही संधी साधत बिट्टूचा गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपून पळून गेली होती.

दरम्यान, पोलिसांनी खूनचा शोध घेण्यासाठी तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेराची मदत घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी पूजाला बक्कारवाला परिसरातून अटक केली. अटक केल्यानंतर पुजाने हत्येची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकराने सेल्फीच्या बहाण्याने तिघींना ठकलले नदीत अन्…

प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!