नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला…

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आमदार, नगरसेवक यांच्यावर हल्ला होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे यांच्यावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना कामठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दिलीप बांडेबूचे हे रात्री घरी जात होते. त्यावेळी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या एकाने प्रथम ते एकटे आहेत हे पाहून संधी साधली आणि त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्यांना पाहून अज्ञात आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…

माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!