हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. नवरी सासरी आल्यानंतर हनिमूनच्या दिवशी नवरदेव मोठमोठ्या ओरडत खोली बाहेर आला. यामुळे नवरदेवाला काय झाले आहे, हे कोणालाच समजेनासे झाले. अखेर, नवरी ही तृतीयपंथी असल्याचे त्याने सांगितल्यानंतर कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला.
मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. लग्नानंतर एक युवक आनंदाने पहिल्या रात्री त्याच्या खोलीत गेला होता. खोलीत गेल्यावर कळले की त्याची पत्नी मुलगी नसून तृतीयपंथी आहे. हे समजल्यानंतर तो मोठ-मोठ्याने ओरडू लागला. याप्रकरणी युवकाने पत्नी, मेव्हणा आणि सासऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि खंडणीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ठाकूरद्वारा कोतवाली परिसरातील आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नवरदेवाने सांगितले की, ‘विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. पत्नीला घरी आणले. हनिमूनच्या रात्रीच पत्नीचं सत्य समजले. पत्नी तृतीयपंथी आहे. मात्र सध्या आपल्यावर उपचार सुरू असून लवकरच पूर्ण महिला बनू, असे तिने पुढे सांगितले. लग्न मोडण्याचा विषय काढल्यानंतर पत्नी भडकली आणि तिच्या माहेरच्यांसोबत मिळून त्याला थेट धमकीच दिली.
पत्नीचे उपचार पूर्ण होण्याची वाट पाहू लागला. त्याचदरम्यान, पत्नी आणि सासरच्यांनी त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाही तर तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. शिवाय, पत्नीच्या घरच्यांनी अनेकवेळा घरी येऊन त्याला मारहाणही केली. या छळाला कंटाळून अखेर पीडित युवकाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी 323, 384, 420, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…