पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…
पुणे : पुणे शहरातील L3 लॉऊन्ज पबमधील ड्रग्ज प्रकरणातील दोन्ही युवकांची ओळख पटली असून, त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. एक युवक हा मुंबईतील गोरेगावचा तर दुसरा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एक आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे.
पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार मधील एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये दोन युवक ड्रग्ज घेत असल्याचे दिसत होते. या व्हिडीओनंतर पोलिसांनी दोघांचा तपास घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिली. त्यामुळे L3 लाउंज पबमध्ये ड्रग्ज घेतले जात होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबईत राहणारा युवक हा आर्किटेक्ट आहे आणि तो मेफेड्रॉन घेऊन पुण्यात आला होता. तर दुसरा पुण्यातील युवक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. दोघे शनिवारी संध्याकाळी एकत्र आले आणि रात्री एल थ्री या पबमध्ये गेले. हे दोघे द कल्ट या पबमध्ये आधी झालेल्या पार्टीत सहभागी झाले नव्हते. द कल्ट या पबच्या मालकावर देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला द कल्ट या पबमध्ये पार्टी झाली आणि नंतर मध्यरात्री दीडनंतर पुढची पार्टी ही एल थ्रीमध्ये सुरू झाली.
एका युवकाला मुंबईतून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे पाच ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. हे मेफेड्रॉन त्याने मुंबईतून खरेदी केले होते. त्यामुळे पुण्यासोबतच मुंबईमध्येही मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलिसांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत या हॉटेलचा मालक, मॅनेजर, कर्मचारी आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तींसह आठ जणांना अटक केली आहे.
Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…
पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…