पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीने बलात्कार करणाऱ्या बापाला जागेवरच संपवलं…
कराची (पाकिस्तान) : बलात्कार करणाऱ्या बापाला अल्पवयीन मुलीने गोळी झाडून जागेवरच संपवल्याची घटना लाहोर शहरातील गुज्जरपुरा परिसरात शनिवारी (ता. २३) घडली आहे.
एका 14 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितले की, ‘बाप गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार करत होता. या त्रासाला कंटाळून बापावर गोळी झाडून हत्या केली.’ या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस अधिकारी सोहेल काझमी यांनी सांगितले, ‘अल्पवयीन मुलगी नरक यातना सहन करत होती. शेवटी तिने तिच्या वडिलांना मारण्याचा निर्णय घेतला. म्हणून तिने बंदुकीने त्याच्यावर गोळी झाडली. या घटनेत मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर संशयितावर गुन्हा दाखल केला जाईल.’
दरम्यान, एका दिवसापूर्वी शुक्रवारी एका पाकिस्तानी न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका वडिलांना फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. लाहोरच्या जेंडर बेस्ड वायलेन्स न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मियां शाहिद जावेद यांनी आरोपी एम. रफिक याला त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…
पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…
पाकिस्तानमध्ये जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; ३५ ठार…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…