Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव येथे भारतीय लष्कराच्या एका जवानाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मारहाण झालेल्या लष्कराच्या जवानाचे नाव परशूराम असून ते जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे तैनात आहेत. सध्या ते रजेवर आहेत. संबंधित जवानाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प करत उपस्थित लोकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी परशूराम हे प्रचंड मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहने थांबवत होते. त्यांच्या या प्रकाराला संतापलेल्या लोकांनाही त्यांनी अपशब्द वापरत शिवीगाळ केली. यावरून शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर सहा जणांच्या टोळक्याने परशूराम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधित सहा जणांनी परशूराम यांना रस्त्याच्या मधोमध खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. लष्कराच्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कर्नाटकात मद्यधुंद सैनिकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण pic.twitter.com/MEZMpFvptI
— Ravindra Mane (@i_am_Ravindra1) November 6, 2023
पुणे शहरात जवानाने घातला पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक…
लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…
जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!