
धक्कादायक! विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू…
चेन्नई (तमिळनाडू): विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, विषारी दारू प्यायल्याने जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी अवैध दारू तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 200 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. तपासणी केली असता दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून आले, हे मद्यपींच्या जीवावर बेतले आहे.
கள்ளக்குறிச்சியில் கள்ளச்சாராயம் அருந்தியவர்கள் உயிரிழந்த செய்திகேட்டு அதிர்ச்சியும் வேதனையும் அடைந்தேன். இந்த விவகாரத்தில் குற்றத்தில் ஈடுபட்டவர்கள் கைது செய்யப்பட்டுள்ளார்கள். தடுக்கத் தவறிய அதிகாரிகள் மீதும் நடவடிக்கை எடுக்கப்பட்டுள்ளது.
இதுபோன்ற குற்றங்களில் ஈடுபடுபவர்கள்… pic.twitter.com/QGEYo9FWJq
— M.K.Stalin (@mkstalin) June 19, 2024
या घटनेची माहिती मिळताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. अशा प्रकारे अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उशीर का झाला? याची चौकशी करण्यात येईल. त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जर अशा प्रकार अवैध दारू विकणाऱ्यांची माहिती मिळाली तर त्याची सूचना पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी ट्विट करुन केले आहे. राज्यपालांनीही कल्लाकुरिचीमध्ये झालेल्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले असून अशा घटना ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.
नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…
पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

